Monday 26 February 2018

युगप्रवर्तक शिवाजी महाराज




           
युगप्रवर्तक शिवाजी महाराज                                                                                                                           गडपती      भूपती,प्रजापती,आशवपती,सुवर्णरत्नंश्रीपदी,अष्टावधानजागृत,न्यायालनकरमंडित,शाश्त्रातशाश्त्रपारंगत,               राजनीती धुरंदर,प्रौढप्रतापपुरंदर,अखन्डलक्ष्मीअलंकृत,हिंदवीस्वराज संस्थापक,

                                     कित्येक तास,दिवस,आठवडे,महिने,वर्षे,संपून  जातील पण महाराज तुमच्या हि कीर्ती संपणार नाही.  केवढा मोठा तो पराक्रम , धाडस, शौर्य,निर्भेद काळीज, ज्याने या देशात हिंदवी स्वराज घडवण्याचा फक्त स्वप्न नाही तयार ते स्वप्न पूर्ण सत्यात उतरवून दाखवलं. अश्या या जाणत्या राजाला माझा सर्व प्रथम मुजरा.


                 १९ फेब्रुवारी १६३० ला एक  युगपुरुष्याचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर  झाला. जणु काही त्या जगदंबे ने या परकीय आक्रमणानं वैतागलेल्या हिंदुस्तानाला शिवाजी महाराजांचा रूपाने एक  आशीर्वादच दिला. मग खरा लढा सुरु झाला तो म्हणजे या अखंड हिंदुस्थान त्या क्रूर आणि सैतानी मुघलांनच्या तावडीतून मुक्त करून अखंड हिंदुस्तानात हिंदवी स्वराज स्थापन करायची शपत शिवाजी महाराजांनी घेतली.
                       सूर्य जसा प्रखर उजळून अंधार नष्ट करत असतो तसा या थोर पराक्रमि शिवाजी राजाने अखंड हिंदुस्थानाला शत्रूच्या अंधार पासून मुक्त करण्याची शपत घेतली होती.

              आजही महाराज तुमचा पराक्रम वाचतो. तर नाथमस्तक झाल्याशिवाय राहवत नाही.
""हे हिंदवी स्वराज स्थापन व्हावे हि तयार श्रींची इच्छा आहे"" मग या शुभकार्यात आलेल्या मुघल निजाम  शी तुम्ही दिलेले लढा फक्त लढा नाही तयार या अश्या बलाढ्य शत्रूला भुईसपाट करून टाकणार तुमचा इतिहास आजही अजरामर आहे.

          महाराज आज तुम्ही नसलात तरी या पश्चिम घाटवरची हि सहयाद्रीच्या रांग आज हा संपूर्ण इतिहास सगळ्यांना जिवंत करून  अभिमानाने सांगत उभा आहे. महाराज आजही आम्ही जेव्हा या सह्याद्रीचा  दऱ्या खोऱ्यात भटकत असतो तेव्हा आजही आम्हाला घोड खिंड लाडवणारा बाजी प्रभू तोफेचा आवाज येई पर्यंत कसा लढा डदयायचा  मग  शरीरामध्ये  प्राण असो किंवा नासो पण राजाच्या शब्धला  मरेपर्यंत कसा उभा राहायचा. याची प्रचिती बाजी त्या पावन खिंडीत देत उभा दिसतो.

                       आजही प्रतापगडाच्या पायथा अभिमानाने खानाचा वधाचा  साक्षीदार बनण्याचा अभिमान मिरवत सगळ्यांना इतिहास पटवून सांगत आहे.
                  आजपण लालमहालातली ती तीन तुटलेली बोठे इतिहास सांगतात कि स्वराज्याकडे वाईट नजरेने बघितल्यावर कसे हाताचा पंजातून वेगळा व्हावा लागत.
                 महाराज आजपण राजगड आणि रायगडच्या सुवेळा माची आणि बालेकिल्ला तुमच्या पराक्रमाची उंची पाठवून सांगत तसाच ताट उभा आहे.

              खरंतर तुमचा हा इतिहास समजून घ्यायाला साथ जन्म घ्याल लागतील. कारण महाराज असा राजा स्वराजा मध्ये  निर्माण व्हायला किती तरी युगांचा काळ जावा लागत असेल. तेव्हा असा राजा जन्माला येत असेल म्हणून राज तुम्ही आम्हाला देवा सामान आहेत. लोक विचारायचे शिवाजी महाराज देवासमान का तर त्यांना माझा पुढच्या चार आळी


माझा राजा , माझा देव होता
घोडयाच्या वेगाने लढाया तो जिंकत होता ,
दीनदुबळ्यांना जवळ तो करीत होता
कोणावर हि अन्याय होऊ देत न्हवता,
म्हणून माझा राजा देव होता.

दाखवले होते त्याने स्वप्न हिंदवी स्वराजाचा या रयतेला
आणि त्या स्वप्नांना जगलेला माझा राजा वीर होता
चारी मुलखात त्याचाच दरारा होता
नाव ऐकतच शत्रू थरथर कपात होता
असा हा माझा राजा शूर होता,

वाटेतल्या संकटाना बाजूला तो सारत होता.
आलेल्या आक्रमनाच्या बिमोड तो करत होता.

शरण आलेल्याना सांभाळून तो घेत होता.
आणि शत्रूचे मुंडके हि छाट्यआला मागेपुढे बघत न्हवता

जिजाऊंचा पोटी जन्मलेला हा थोर पराक्रमी राजा होता.
स्वराजा साठी प्राणाची आहुती हि द्यायला तो तयार होता.
म्हणून माझा राजा माझा देव होता.



                                                               - अक्षय दत्तात्रय पोळ.